Local State Newspaper in India, Lokmat covered our Startup Story under the New Startup India Movement which just launched over the weekend. The article reads as below in Marathi.
Link can be found here. http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12
हस्तकलेसाठी ऑनलाइन गॅलरी |
||
युवा उद्योजकांची कहाणी : कलाकारांना उपलब्ध करून दिली बाजारपेठ |
||
खुले फोरम : ‘सोशल मीडिया’चाही विक्रीसाठी वापर |
||
■ अक्षया यांना पहिल्याच वर्षात ४ पुरस्कार मिळाले आहेत. स्टीव्ही अँवॉर्ड्स फॉर वूमन अँन्ड बिझनेस आणि यंग आंत्रुप्रिनर, स्टार्ट अप ऑफ बिझनेस; तसेच बेस्ट वेब प्रेझेन्स आणि क्रिएटिव्ह मार्केटिंग ऑन बजेट बिझनेस इन ऑस्टेलिया यासाठी ब्रिलियन बिझ मम अँवॉर्ड्स २0१५ ने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे : आपल्याकडील कला वृद्धिंगत व्हावी, यासाठी प्रत्येक कलाकाराला साधना करावीच लागते; मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या कलेचा आपल्या वेगळेपणाचा टिकाव लागण्यासाठीही कलाकारांना झटावेच लागते; मात्र प्रत्येकाला जमत नाही, काहींपुढे आर्थिक र्मयादा असतात, तर काहीजणांना लोकांना सामोरे जाण्याचे कौशल्य नसते. याचा परिणाम हा अनेकदा चांगली कलाकृतीही स्पर्धेत मागे पडते. हीच बाब लक्षात घेऊन एका तरुणीने ‘स्ट्रगलिंग आर्टिस्ट’ ही संकल्पना संपवून ‘दी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी’ हे मल्टिइंटरनॅशनल अपारंपरिक ऑनलाइन दालन सुरू केले आहे. या दालनामुळे कलाकारांना ‘सोशल मीडिया’चे जागतिक व्यासपीठ आणि रसिक ग्राहक मिळू शकणार आहेत. |